Roadside Juice Lonavla Viral Video : उन्हाळ्यात प्रत्येकाला काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. कारण- वाढत्या उकाड्यात थंडगार पदार्थ खाल्ल्यानं थोडं बरं वाटतं. त्यामुळे उन्हाळ्यात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बर्फाच्या गोळ्यासह, उसाचा रस, सरबत, ज्यूस अशा थंडपेयांची मागणी वाढते.
ज्युस पिणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO पाहाच 100 वेळा कराल विचार
मात्र तहान भागवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण रस्त्यावर विकला जाणारा थंडगार ज्यूस पीत असतील. मात्र, हा ज्यूस पिणे आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
लोणावळ्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही रस्त्यावरचा ज्यूस पिणं बंद कराल.
ज्युस पिणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO पाहाच 100 वेळा कराल विचार
लोणावळ्याच पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. लोणावळ्यात चक्क एका ज्युस सेंटरवाल्याने ज्युस बनवण्यासाठी सडक्या आंब्याचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंर आक्रमक होत मावळ तालुका मनसे अध्यक्ष अशोक कुटे आणि मनसैनिकांनी ज्युस सेंटरला टाळे ठोकले आहे. संजय ज्यूस सेंटर नावाचे हे थंडगार फळांचा रस विक्री करणाऱ्या दुकानचे नाव आहे. या ज्यूस सेंटरवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.