Ration Card Update : 1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे. राज्यातील रेकार्डधारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आले होते.
1 मेपासून या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य होणार बंद
1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे. राज्यातील रेकार्डधारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. अशा परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांनी अजूनही e-KYC केले नाही अशांचे रेशन बंद होणार आहे.
1 मेपासून या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य होणार बंद
शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी गरजू नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ, गहू, डाळी, साखर यांचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी डुप्लिकेट किंवा अपात्र लाभार्थी रेशनचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने, शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.