Ration Card List : महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे, ज्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही. भोर तालुक्यात सुमारे एकूण केवायसी 118335 पैकी राहिलेल्या 41248 ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी सरकारने 31 मार्चची मुदत दिली.
या नागरिकांचे मोफत रेशन होणार बंद
सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. ही प्रलंबितता मोठी असल्याने यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती. राज्य सरकारने यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्व तालुका पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला केवायसीचे निर्देश दिले.
या नागरिकांचे मोफत रेशन होणार बंद
भोर तालुक्यात सुमारे एकूण केवाससी 118335 पैकी 41248 ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. या नोंदी सध्या तालुका पुरवठा अधिकारी लॉगिनला असून त्यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसीसाठी करावी.
ई-केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसी म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर’ (Electronic Know Your Customer). ही एक ऑनलाइन प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शिधापत्रिका धारकांची ओळख आणि पत्ता पडताळला जातो. यामुळे शासनाला लाभार्थ्यांची अचूक माहिती मिळते आणि अन्नधान्याचे वितरण योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते.
या नागरिकांचे मोफत रेशन होणार बंद
ई-केवायसी करण्याचे फायदे:
अनुदानित अन्नधान्याचा लाभ: ई-केवायसी पूर्ण केल्यास, तुम्हाला नियमितपणे अनुदानित अन्नधान्य मिळत राहील.
शिधापत्रिकेवरील माहिती अद्ययावत: ई-केवायसीमुळे शिधापत्रिकेवरील माहिती अद्ययावत राहते, ज्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येत नाही.
पारदर्शकता: ई-केवायसीमुळे अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता येते, ज्यामुळे गैरव्यवहार टाळता येतात.
सरकारी योजनांचा लाभ: ई-केवायसी पूर्ण केल्यास, तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते.
ई-केवायसी कुठे करावी?
तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत घेऊन जावे लागेल.
ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
रेशन कार्ड
ई-केवायसी प्रक्रिया:
रेशन दुकानात गेल्यावर, रेशन दुकानदाराला ई-केवायसी करायची आहे, असे सांगा.
रेशन दुकानदार तुमचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड स्कॅन करतील.
तुमच्या बोटांचे ठसे घेतले जातील.
तुमची माहिती पडताळली जाईल आणि ई-केवायसी पूर्ण होईल.
महत्त्वाचे:
ई-केवायसीची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.
शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
कोणत्याही अडचणी आल्यास, तुमच्या जवळच्या तालुका पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा.