pm kisan installment update शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये माहे डिसेंबर 2024 पासून मार्च 2025 या कालावधीचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामध्ये आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात बिहारमधील भागलपुर येथे होण्यात येणाऱ्या समारंभात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे.
समारोहातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण
भागल्पुर बिहार येथे होणारा समारंभ किसान सन्मान समारोह हा साजरा केला जाणार आहे आणि याच कार्यक्रमात शासना नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी 2025 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात या 19 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे आपण पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निश्चित वार्षिक उत्पन्न म्हणून फेब्रुवारी 2019 पासून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये निश्चित उत्पन्न म्हणून सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत दर चार महिन्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये अशाप्रकारे वर्षाला तीन हप्त्याने सहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना वितरित केले जाते.
आपण पाहिलं तर या योजनेच्या पात्रता निकषानुसार जे सर्व पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना प्रति दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतात आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील जे पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना यापूर्वी एकूण 18 हप्त्यांचे वितरण केलेले आहे आणि ही जी आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण झाले आहे यानुसार पाहिलं तर 33565 कोटींचा लाभ आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 वा हप्ता
पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला जर वार्षिक सहा हजार रुपये अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांना आपली भूमी अभिलेख नोंदणी करणे अनिवार्य आहे याचबरोबर तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक असणे गरजेचे आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आधारची ई केवायसी करणे बंधनकारक आहे यानुसार पाहिलं तर राज्यातील या तीनही बाबींची पूर्तता करणारे 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 24 फेब्रुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1965 कोटींचा निधी बँक खात्याला आधार लिंक असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.
समारोहातून शेतकऱ्यांना होणार फायदा
संपूर्ण राज्यात कृषी विज्ञान केंद्र जिल्हा तालुका याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर हा समारोह आयोजित केला जाईल या समारंभात शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे प्रदर्शने आणि विविध योजनांची माहिती आणि त्यांच्या लाभ वितरण विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. याचबरोबर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जी ॲग्री स्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची माहिती याचबरोबर फार्मर आयडी साठी होणारी नोंदणी ही नागरी सुविधा केंद्राद्वारे केली जात आहे.
तुम्हाला जर या समारंभासाठी सहभागी व्हायचे असेल तर समारोहाचे थेट प्रक्षेपण हे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर होणार आहे या अधिकार वेबसाईट ची लिंक(https://pmindiawebcast.nic.in) ही आहे यावर जाऊन तुम्ही या समारंभासाठी सहभागी व्हावे असे आव्हान देखील राज्यातील शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे