Pik Vima : राज्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून विमा भरपाईसाठी प्रतीक्षेत होते. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, “शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी, यासाठी सरकार प्राधान्याने कार्यरत आहे. विमा कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्सा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
👉 इथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा 👈
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात थोडा उशीर झाला, मात्र आम्ही खात्री देतो की 31 मार्चपूर्वी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.”
सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार राहुल पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, “खरीप हंगामातील पीक विमा ऑगस्ट महिन्यात मिळायला हवा होता. मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वेळेत दिला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या हक्काच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे. जर सरकारने वेळीच निर्णय घेतला असता, तर शेतकऱ्यांना कर्जाचा भार सहन करावा लागला नसता.”
👉 इथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा 👈
विमा वितरणातील विलंबाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी विमा कंपन्या आणि बँकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “विमा कंपन्या मंजूर झालेली रक्कम वेळेवर शेतकऱ्यांना देत नाहीत. बँकांकडून त्यावर व्याज घेतले जाते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निधी मिळत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित बँकांना जबाबदार धरावे.” अशी मागणी करण्यात आली आहे.