Mahila Samriddhi Yojana : दिल्ली सरकारने महिलांसाठी खास महिला समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहेत.
याच महिलांना दर महिन्याला मिळणार २५०० रुपये
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवल्या होती. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. त्यानंतर आता दिल्ली सरकारनेही महिला समृद्धी योजना राबवली आहे.
याच महिलांना दर महिन्याला मिळणार २५०० रुपये
दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेच्या रजिस्ट्रेशनची सुरुवात महिला दिन म्हणजेच आजपासून झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी महिलांना २५०० रुपये देऊ, असं भाजपने जाहिरनाम्यात सांगितले होते. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. यामुळे आता ही योजना राबवण्यात आली आहे. महिला समृद्धी योजनेत दर महिन्याला महिलांना २५०० रुपये दिले जातात.
याच महिलांना दर महिन्याला मिळणार २५०० रुपये
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यात गरीब महिलांना दर महिन्याला २५०० रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. भाजप सरकारने आता या योजनेची अंबलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ८ मार्चपासून रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.