LIC Smart Pension Plan Scheme देशातील सर्व नागरिकांना माहीतच आहे की देशातील सर्वात मोठी जी विमा कंपनी आहे ती विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा निगमन ही आहे म्हणजेच याला आपण एलआयसी देखील असे म्हणतो आता एलआयसी कडून नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन लॉन्च केलेला आहे या नवीन प्लॅनचा फायदा ग्राहकांना एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर पेन्शन मिळवण्यासाठी होणार आहे तर चला जाणून घेऊया हा नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन काय आहे.
आपण पाहिलं तर एलआयसीला देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळखले जाते आणि याच एलआयसी कडून ग्राहकांसाठी एक नवीन पेन्शन प्लॅन लॉन्च केलेला आहे. या नवीन योजना अंतर्गत ग्राहकांना फक्त एकच प्रीमियम भरायचा असतो. या प्लॅनला इमिजिएट एन्यूटी प्लॅन असं देखील म्हटलं जातं हा प्लॅन तुम्हाला वैयक्तिक किंवा संयुक्त या पद्धतीने एक जीवन एन्यूटी पर्याय उपलब्ध करून दिला जातो. हा प्लॅन एलआयसी चे सीईओ नागराजे यांच्या हस्ते लॉन्च केला गेला.
या प्लॅन विषयी महत्त्वाच्या बाबी
हा नवीन लॉन्च झालेला प्लॅन तुमच्या येणाऱ्या भविष्यातील काळासाठी सुरक्षित करण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि या नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन साठी तुम्ही एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर तुम्हाला टेन्शन मिळू शकते यामध्ये तुम्ही स्वतः एकटे किंवा तुमच्या सोबत अधिक व्यक्ती घेऊन संयुक्त एन्यूटी पर्याय निवडून गुंतवणूक करू शकता या प्लॅनचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुमची वय 18 ते 100 यामध्ये असायला हवे जे कोणी एल आय सी चे विद्यमान ग्राहक आहेत आणि नॉमिनी आहेत यांना अधिक परतावा मिळेल जर यामध्ये कोणीही एक लाख रुपयांच्या रकमेपासून गुंतवणूक सुरू केली तर त्यांना चांगला अधिक फायदा मिळू शकतो.
या पेन्शन प्लॅन अंतर्गत तुम्ही पेन्शन मिळवताना महिन्याला तीन महिन्याला आणि सहा महिन्याला टेन्शन असे वेगवेगळे पर्याय किंवा पद्धतीने पेन्शनचा लाभ घेऊ शकता जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी किंवा पैशाची गरज भासेल तेव्हा तुम्ही या प्लॅन मधील गुंतवणुकीचे सर्व पैसे पूर्ण पणे काढू शकता.
जे कोणी एन पी एस सबस्क्रायबर आहेत यांना या प्लॅनचा लाभ अधिक फायदेशीर ठरेल जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्यांना या योजनेमध्ये विशेष पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत या प्लॅनमध्ये एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यानंतर फक्त तीन महिन्यानंतर तुम्हाला कर्जाचीही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे तुमच्या रिटायरमेंट नंतर हा प्लॅन तुमच्यासाठी एक परफेक्ट आणि फायदेशीर गुंतवणूक ठरू शकते.
यामध्ये जर कोणत्याही पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायानुसार पैसे दिले जाणार आहेत यामध्ये संपूर्ण निर्णय हा कुटुंबाच्या हाती असणार आहे जर त्यांना पूर्णपणे रक्कम काढायचे असेल तर पूर्ण रक्कम काढू शकता किंवा निवडलेल्या पर्यायानुसार ते मासिक पेन्शन सुद्धा घेऊ शकता याचबरोबर तुम्हाला हप्त्यामध्ये पैसे मिळण्याचा देखील एक चांगला पर्याय देण्यात आलेला आहे ज्यातून तुम्ही त्या गुंतवणुकीनुसार वेळोवेळी पैसे काढू शकता यामुळे ही गुंतवणूक तुम्हालाही रिटायरमेंट नंतर किंवा तुमच्या कुटुंबालाही एक आर्थिक सुरक्षा म्हणून चांगला पर्याय आहे.
या स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये कशी गुंतवणूक करायची?
हा प्लॅन तुम्ही खरेदी करण्यासाठी जे कोणी एलआयसी चे पॉईंट ऑफ सेल्स असतात अशा व्यक्तीकडून गुंतवणुकीसाठी अर्ज करू शकता किंवा जे सी पी एस सी एस पी व्ही असतात यांच्याकडून देखील हा प्लॅन तुम्ही खरेदी करू शकता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जे वार्षिक पर्याय आणि पात्रता याचबरोबर अटी शर्ती आहेत या पूर्ण करून तुम्ही प्लॅन खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी येथे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिक माहिती पाहू शकता : https://licindia.in/web/guest/lic-s-smart-pension