Ladaki Bahin Yojana Bank Account : राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा
एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. अशातच आपल्या खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे? हे जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.
महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा
1) तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
2) तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा
4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.
महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा