Gold Rates Today : सोने आणि चांदी अखेर खाली आले. गेल्या चार दिवसांच्या वाढत्या किमतींच्या मालिकेला विराम लागला आहे. ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी आराम मिळाला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीच्या किंमती जाणून घ्या.
सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही धातूंनी वेगवान वाढ नोंदवल्याने ग्राहकांच्या मनात मोठी चिंता निर्माण झाली होती. जगात शांतता प्रस्थापित होत असताना या किंमती का वाढत आहेत? या दोन्ही धातूंना कशाचा आधार मिळत आहे, असा प्रश्न सर्वच ग्राहकांना पडला आहे. अमेरिकेच्या आक्रमक धोरणाला यासाठी जबाबदार धरले जात आहे. पण आठवड्याच्या शेवटी दोन्ही धातूंनी थोडा आराम घेतला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीच्या किंमती जाणून घ्या.
सोने 440 रुपयांनी स्वस्त Gold Rates Today :-
या सोमवारी सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर थेट शुक्रवारी सोने 440 रुपयांनी कमी झाले. तर मंगळवारपासून ते गुरुवारपर्यंत सोन्याने हजार रुपयांची वाढ नोंदवली. मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी दर वाढले. गुरुवारी 220 रुपयांनी किंमत वाढली होती. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 2100 रुपयांनी खाली आली
चांदीने सोन्याशी स्पर्धा सुरू केली होती. सोमवारी चांदी 100 रुपयांनी कमी झाली होती. मंगळवारी 1100, बुधवारी 1000 रुपये तर गुरुवारी 100 रुपयांनी किंमत वाढली होती. तर शुक्रवारी चांदी 2100 रुपयांनी खाली आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीची किंमत 1,03,000 रुपये इतकी आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय?
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,169, 23 कॅरेट 87,816, 22 कॅरेट सोने 80,763 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,127 रुपये, 14 कॅरेट सोने 51,579 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीची किंमत 97,620 रुपये इतकी झाली आहे. वायदे बाजारात आणि(Gold Rates Today) आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कोणताही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने किंमतीत फरक दिसून येतो.
घरी बसून किंमत जाणून घ्या
सोने-चांदीच्या किंमती तुम्ही घरी बसूनही जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येतील. त्यात स्थानिक कर, इतर करांचा समावेश होतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत फरक दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस वगळता या किंमती जाहीर केल्या जातात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.