bank of baroda recruitment 2025 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता जे कोणी पदवीधर विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे बँक ऑफ बडोदा ने अप्रेंटिस या पदासाठी भरती सुरू केलेली आहे आणि यासाठी अर्ज मागवलेले आहेत.
आणि ही अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज भरण्यासाठी सुरू केलेली आहे या पदांसाठी जे कोणी पदवीधर विद्यार्थी इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांना 11 मार्च 2025 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
विद्यार्थ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे बँक ऑफ बडोदा आणि एकूण आपण पाहिलं तर 4000 पर्यंत अप्रेंटिस या पदांसाठीच्या भरतीचे अर्ज मागवलेले आहेत देशातील वेगवेगळ्या राज्यातून या पदासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील आणि यासाठी विद्यार्थ्याला आपल्या स्थानिक भाषेचे नॉलेज असायला हवे याचबरोबर जर या पदासाठी तुमची निवड झाली तर तुम्हाला प्रति महिना पंधरा हजार ते वीस हजार रुपये पर्यंत स्टायपेंड हे दिले जाईल.
या पदासाठी अर्ज करणाऱ्याची पात्रता काय आहे
आता आपण पाहिलं तर या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा अप्रेंटिस पदासाठी पात्र ठरवायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे हे गरजेचे आहे तसेच जो अर्ज करणारा उमेदवार आहे त्याला आपल्या जी काही स्थानिक भाषा आहे ती येणे गरजेचे आहे याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या आत मध्ये असायला हवे याचबरोबर जी कोणी उमेदवार राखीव प्रवर्गातील असतील त्यांना कमीत कमी वयोमर्यादेतही चांगल्या प्रकारे सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी किती शुल्क भरावे लागणार
आपण पाहिलं तर यामध्ये जे कोणी अर्जदार जनरल किंवा ओबीसी या कॅटेगरीतील आहेत त्यांना या अर्जासाठी आठशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे याच बरोबर जे कोणी अनुसूचित जाती किंवा जमाती या कॅटेगिरीतील असतील तर या उमेदवारांना 600 रुपये, आणि जे कोणी दिव्यांग अर्जदार आहेत अशा विद्यार्थ्यांना फक्त चारशे रुपये शुल्क भरावी लागणार आहे आणि याच बरोबर जे जे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करणार आहेत अशा सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना जी शुल्क आहे त्या शुल्क वर जीएसटी भरावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
तुम्हाला अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट(bankofbaroda.in) वर जावे लागणार आहे.
आता होम पेजवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला करिअर टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्ही करंट ऑपॉर्च्युनिटी या ऑप्शन वर क्लिक करा.
आता तुम्हाला खाली अप्रेंटिस अप्लाय ऑप्शन दिसेल त्या लिंक वर क्लिक करा.
लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करून फॉर्म संपूर्ण भरा.
आता शेवटी तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून शेवटी जे काही तुमचे कॅटेगरीनुसार जीएसटी सोबत शुल्क आहे ते भरून तुमचा फॉर्म सबमिट करून द्या अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल.
पदासाठी निवड कशी केली जाईल?
आता आपण पाहिलं तर अप्रेंटिस पदासाठी अर्जदारांची निवड ही सीबीटी परीक्षा मेडिकल टेस्ट तुमची भाषा टेस्ट आणि याचबरोबर तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाईल या परीक्षेत तुम्हाला सामान्य आणि आर्थिक जागरूकता हिंदी किंवा इंग्रजी परिणात्मक आणि तार्क योग्यता याचबरोबर कम्प्युटर नॉलेज किंवा सामान्य इंग्रजी संबंधित जे काही प्रश्न असतील ते विचारले जातील.
निवड कशी केली जाईल याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर उमेदवार बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेची संपूर्ण माहिती वाचून याविषयी जाणून घेऊ शकता त्यासाठी अधिकारच वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण अधिसूचना पाहून तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.