School Teacher Dance Viral Video : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची शाळेतील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. त्या व्हिडिओच्या मागे त्या शाळेचे नाव दिसत आहे. तसेच काही युजरने नाद करायचा नाही, शेवटी कोल्हापुरीच आम्ही, अशी कमेंट दिली आहे.
शाळेच्या शिक्षिकेचा भन्नाट डान्स, नेटकरी झाले फिदा
शाळा म्हणजे फक्त अभ्यास नसतो. शाळेत ज्ञानबरोबर इतर कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे शाळा असो की महाविद्यालय वार्षिक महोत्सव होत असतो. त्यातून लहान लहान विद्यार्थी आपली चमक दाखवत असतात. महाविद्यालयातील या कलागुणांमुळे पुढे अनेक कलाकार घडले आहेत. सोशल मीडियावर शाळेतील कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.
शाळेच्या शिक्षिकेचा भन्नाट डान्स, नेटकरी झाले फिदा
आता सोशल मीडियावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेचा भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मराठमोळ्या गाण्यावर शिक्षिकेने केलेला हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे त्याच्यावर कमेंटचा पाऊस सुरु झाला आहे.
काय आहे त्या व्हिडिओत?
शाळेच्या मैदानावर एक शिक्षिका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नृत्य करत आहे. अगदी मराठमोळ्या गाण्यावर तिचे नृत्य होत आहे. तिच्यासोबत विद्यार्थीही त्या टेप्स फॉलो करताना दिसत आहे. ‘फुलवंती’ चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. त्याच गाण्यावर ही शिक्षिका नृत्य करत आहे. त्या चित्रपटात प्राजक्ता माळी हिचा डान्स पाहून सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ‘अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी’ हे ते गाणे होते. या गाण्यावर शिक्षका भन्नाट डान्स करत आहे.
शाळेच्या शिक्षिकेचा भन्नाट डान्स, नेटकरी झाले फिदा
सोशल मीडियावर व्हायरल
शिक्षिकेचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्टाग्रामवर sapana0014 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याला लाखो लोकांनी पाहिले आहे. हजारो नेटकाऱ्यांनी त्याला लाईक केले आहे. अनेकांनी हा कुठल्या शाळेतील व्हिडिओ आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर काही जणांनी कमेंटमध्ये दिले आहे.
शाळेच्या शिक्षिकेचा भन्नाट डान्स, नेटकरी झाले फिदा
शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील?
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची शाळेतील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. त्या व्हिडिओच्या मागे त्या शाळेचे नाव दिसत आहे. तसेच काही युजरने नाद करायचा नाही, शेवटी कोल्हापुरीच आम्ही, अशी कमेंट दिली आहे. शाळेत कोण होते, त्यावर माजी विद्यार्थ्यांनी चर्चा सुरु केली आहे. कशी आहे वडगावची वाघिण? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे.