सर्वाधिक भरपाई लातूर विभागाला
लातूर विभागाला एकूण 1,404 कोटी 12 लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली असून त्यात 691 कोटी 36 लाख रुपये स्थानिक आपत्तींसाठी व 712 कोटी 75 लाख रुपये हवामानाशी संबंधित नुकसानीसाठी आहेत. त्यापैकी बहुतेक रक्कम आधीच वितरित झाली आहे.
इतर प्रमुख विभागांतील भरपाईची स्थिती
विभाग मंजूर भरपाई (कोटी ) वितरण (कोटी ) शिल्लक (कोटी )
नाशिक 149.88 102.72 47.15
पुणे 282.99 133.55 169.44
कोल्हापूर 15.49 9.67 5.82
छत्रपती संभाजीनगर 564.18 404:11 160.07
लातूर 1 404.12 1263.35 140.76
अमरावती 629.04 433.36 195.68
नागपूर 219.63 219 .28 0.35
वितरित झालेली नुकसानभरपाई कशासाठी?
कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत वितरित झालेल्या 2,546 कोटी 6 लाख रुपयांपैकी 1,844 कोटी 44 लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी 701 कोटी 62 लाख रुपये हंगामातील प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आले आहेत.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला असून, उर्वरित रक्कम लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.