राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना आवश्यक वाटा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, 31 मार्चच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधीमंडळात दिली आहे.