अनुदानाची रक्कम:शेततळ्याच्या आकारानुसार शासनाकडून अनुदान दिले जाते.

15 × 15 × 3 मीटर – 28,275 रुपये.
20 × 20 × 3 मीटर – 41,218 रुपये.
20 × 25 × 3 मीटर – 31,598 रुपये.
25 × 25 × 3 मीटर – 49,671 रुपये.
25 × 25 × 3 मीटर (वैकल्पिक) – 58,700 रुपये.
30 × 25 × 3 मीटर – 67,728 रुपये.
30 × 30 × 3 मीटर – 75,000 रुपये.

अर्ज प्रक्रिया:

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा.
“सिंचन, साधने व सुविधा” हा पर्याय निवडा.
“वैयक्तिक शेततळे” हा पर्याय निवडा.
शेततळ्याचा प्रकार (इनलेट व आउटलेट असलेला किंवा नसलेला) निवडा.
शेततळ्याचे मोजमाप आणि स्लोप निवडा.
अर्ज सबमिट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

किंवा तुम्ही तुमच्या गावातील महा-ई-सेवा केंद्रात जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन या योजनेचा अर्ज महा-ई-सेवा केंद्रात ऑनलाइन पद्धतीने करू शकता.