अर्ज कसा करायचा?

महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे. या प्रक्रियेला दीड महिन्याचा कालावधी आहे. या योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाउंटस उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र सबमिट करावे लागणार आहेत. ज्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.