1) जुनी कागदपत्रे शोधा
सर्वप्रथम, तुमच्या कुटुंबातील जुन्या कागदपत्रांची तपासणी करा. विक्री करार (sale deed), भेट करार (gift deed), वारसा करार (inheritance deed), किंवा जमीन वाटपाशी संबंधित दस्तऐवज मिळाल्यास ते तुमच्या मालकीचा आधार ठरू शकतात.
2) शेजाऱ्यांकडून पूरक पुरावे मिळवा
शेजारील जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तुमच्या जमिनीचा उल्लेख असल्यास, तो तुमच्या दाव्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. याशिवाय, शेजाऱ्यांच्या साक्षीने तुम्ही त्या जमिनीचा वापर करत असल्याचे दाखवता येते.
3) ताबा सिद्ध करणारे पुरावे गोळा करा
तुमचा ताबा सातत्याने राहिल्याचे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुढील कागदपत्रे उपयुक्त ठरतात जसे की, वीज व पाण्याचे बिल, मालमत्ता कराच्या पावत्या, ग्रामपंचायत किंवा पालिकेचे प्रमाणपत्र,शेजाऱ्यांची साक्ष
4) कायदेशीर सल्ला व मदत घ्या
अनुभवी वकिलाकडून मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे. तो तुमच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला देईल आणि आवश्यक कागदपत्रांची सिद्धता किंवा नोंदणी प्रक्रियेस मदत करेल.
5) दिवाणी खटला दाखल करा
जर पुरावे आणि साक्षीदार तुमच्या बाजूने असतील, तर तुम्ही न्यायालयात मालकीसाठी दिवाणी खटला दाखल करू शकता. कोर्ट तुमच्या पुराव्यांच्या आधारे निर्णय देईल.
6) ‘प्रतिकूल ताबा’ ही तरतूद वापरा
भारतीय कायद्यातील ‘प्रतिकूल ताबा’ (Adverse Possession) ही एक महत्त्वाची तरतूद आहे. जर एखाद्या व्यक्तीने 12 वर्षांहून अधिक काळ एखाद्या जमिनीवर शांततामय आणि सातत्यपूर्ण ताबा राखला असेल आणि खऱ्या मालकाने या कालावधीत कोणताही दावा केला नसेल, तर भोगवटादार कायदेशीर मालक ठरू शकतो. यासाठी अनेक अटी आहेत जसे की,
ताबा शांततेत आणि उघडपणे असावा.
12 वर्षे सलग ताबा असावा.
खऱ्या मालकाला याची जाणीव असावी.
7) ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेशी संपर्क करा
ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात पालिकेकडून तुमचा ताबा प्रमाणित करणारे प्रमाणपत्र मिळवता येते, जे तुमच्या दाव्याला बळकटी देते.
दरम्यान, जरी तुमच्याकडे मालकीची थेट कागदपत्रे नसली, तरी योग्य पुरावे, कायदेशीर प्रक्रिया आणि सल्ल्याच्या आधारावर तुम्ही तुमच्या जमिनीचा हक्क मिळवू शकता. कुठलीही कारवाई करताना कायदेशीर सल्ला घ्या